युक्रेनवरून सुखरूप आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
पनवेल : पनवेल महानगरपालिका आणि पनवेल तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानातून पनवेल क्षेत्रातील युक्रेनवरून सुखरूप आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त सचिन पवार, तहसिलदार विजय तळेकर,नायब तहसिलदार राहुल सुर्यवंशी उपस्थित होते.
रशिया आणि युक्रेन यांच्यांमधील युध्दाचा फटका हा केवळ त्या देशांनाच नाहीतर त्याठिकाणी शिक्षणासाठी गेलेल्या भारतातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. भारत सरकारने विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी ' ऑपरेशन गंगा' सुरु केले आहे. या अंतर्गत पनवेल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यात आले आहे.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युक्रेन वरुन आलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली,या विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले हृदयद्रावक अनुभव सांगितले.
Post a Comment