अवास्तव मालमत्ता कराच्या विरोधात पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा ..
खारघर - पनवेल महानगरपालिकेने आकारलेल्या अवास्तव मालमत्ता कराच्या विरोधात ९५ गाव नवी मुंबई नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीतर्फे भव्य लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता खारघरच्या हिरानंदानी चौकापासून ते पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावर असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या लॉंग मार्चचे नेतृत्व अध्यक्ष कामगार नेते अॅड. सुरेश ठाकूर हे करणार आहेत.
पनवेल महानगरपालिकेने जनतेवर लादलेला हा जाचक जिझिया मालमत्ता कर आहे, याविरोधात हा लॉंग मार्च असून मालमत्ता कर त्वरित रद्द करा, शहरातील, गावातील बहुतांश भूखंड हे सिडकोने भाडे तत्वाने दिलेले असल्याने सिडकोकडून मालमत्ता कर वसूल करण्यात यावे तसेच कचरा कर रद्द करावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.
Post a Comment