News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जायंटस् ग्रुप ऑफ पनवेलच्या भव्य मेडीकल कॅम्पला पनवेलकरांचा प्रतिसाद ..

जायंटस् ग्रुप ऑफ पनवेलच्या भव्य मेडीकल कॅम्पला पनवेलकरांचा प्रतिसाद ..

पनवेल (संजय कदम) ः जायंटस् ग्रुप ऑफ पनवेल व श्री जैन श्वेतांबर स्थानक ट्रस्ट पनवेल यांच्यातर्फे जैन स्थानकमध्ये भव्य मेडीकल कॅम्प ठेवण्यात आला होता. 
  त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या मेडीकल कॅम्पमध्ये ईसीजी, ब्लड शुगर, बी.पी., एचबी1सीए, लिपीड प्रोफाईल, बोन डेंसिटी, डेंटल, दातांची तपासणी तसेच आदींची तपासणी एसआरएल लॅबतर्फे क्रिइटीन व थॉयरॉईड तपासणी करण्यात आली. यात १२० जणांनी तपासणी करून घेतली. यासाठी डॉ.निलेश बांठीया यांचे  सहकार्य लाभले. या कॅम्पचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. 

        यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रिती जॉर्ज यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले.
                जायंटस् रो फेडरेशनचे अध्यक्ष महेंद्र बांठीया, अध्यक्ष सुनील शेटे व सिनिअर मेंबर्स किर्ती देढीया, भावी अध्यक्ष अरुण वैशंपायन, हरिश शहा, अशोक शहा, अरविंद लोखंडे यांनी अथक परिश्रमाने हा कॅम्प यशस्वी केला. 

       सदर तपासणी ही विनामुल्य त्याचबरोबर आवश्यक असणारी औषधे विनामुल्य देण्यात आली. यावेळी जायंटस फेडरेशनचे अध्यक्ष महेंद्र बांठीया यांनी अशा प्रकारचे कॅम्प, रक्तदान शिबीर व इतर समाजोपयोगी कार्यक्रम वेळोवेळी करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment