रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांचं शुभमंगल सावधान
पनवेल - रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी ह्या रविवारी विवाह बंधनात अडकणार आहेत.
पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथे राहणाऱ्या योगिता पारधी यांचा विवाह सारमाळ,शहापूर येथील अविनाश यांसबरोबर होणार आहे. रविवार दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ६.०५ मिनिटांनी पनवेल जवळील मोरबे येथील ऐश्वर्या रिसॉर्ट येथे हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे,कोकण विभागीय आयुक्त डॉ. विशाल पाटील, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे ,आमदार जयंत पाटील, भरत गोगावले, महेंद्र दळवी ,महेंद्र थोरवे ,अनिकेत तटकरे ,बाळाराम पाटील ,रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, बांधकाम सभापती नीलिमा पाटील ,सभापती गीता जाधव, दिलीप भोईर, बबन मनवे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, धैर्यशील पाटील, शेकापक्षाचे आस्वाद पाटील, जे एम.म्हात्रे ,काशिनाथ पाटील,विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, तसेच रवीशेठ पाटील,दिलीप खानावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment