महिलांसाठी खांदा कॉलनी येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर
पनवेल - जागतिक महिला दिनानिमित्त न्यू स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सोहम फाउंडेशन, सरगम संगीत अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खांदा कॉलनी येथील देवी आंबामाता मंदिर, सेक्टर १३ येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हे शिबीर होत असून या शिबिरात महिलांचे आजार व उपचार, फॅमिली प्लॅनिंग सल्ला, गर्भपिशवीचे आजार, ब्लड प्रेशर, हाडातील कॅल्शियम तपासणी, शरीरातील ऑक्सिजन लेव्हल तपासणी, सांधेदुखी, गुडघेदुखी, पाटदुखी, मानदुखी, मनक्याचे विकार, मासिक पाळी बंद झाल्यावर होणार्या हाडांच्या विकारांचे निदान व उपचार आदी तपासण्या करण्यात येणार आहेत.
Post a Comment