प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित केल्याने सरकारचे अभिनंदन : पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचा ठराव
पनवेल :- नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित केल्याने महाविकास आघाडी सरकारचा अभिनंदन ठराव पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे.
पनवेल – उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास खात्याने घेतला व त्यासंबंधीचे शासकीय परिपत्रक दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी काढून सिडकोला तसा आदेश दिला त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या स्वर्गीय दि. बा. पाटलांना खरी श्रद्धांजली महाविकास आघाडीने वाहिली.
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे अभिनंदन करण्याचा ठराव पनवेल शहर जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीने दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पारित केला आहे. ही बैठक पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ठरावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉग्रेसचे विधिमंडळ सभागृह नेते बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री आदिती तटकरे यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.
Post a Comment