रायगडच्या मातीतलं .. कवी मनाचं . पनवेलमध्ये.पोेपटी कवी संमेलन ..
नवीन पनवेल । हिरवागार निसर्ग आणि सोबतीला हवाहवासा वाटणारा गारवा.कवितांचा आस्वाद घेताना पोपटीची चव चाखण्याचा आनंद अवर्णनीय असतो. असाच आनंद देणारे रायगडच्या मातीतल्या पोपटी कवी संमेलनाला अनेक वर्षांची परंपरा आहे. याही वर्षी या पोपटी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक,कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता तामसई (दुंदरे) येथील नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आले आहे.
या पोपटी कवी संमेलनाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे, नाट्य निर्माता विनोद नाखवा, कोमसापचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित राहणार आहेत.
हे पोपटी कवी संमेलन नि:शुल्क असून या कविसंमेलनास कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाजे या गावाच्या शेतात रात्रीच्या वेळी एका मडक्या शेतातील गवत ,माक्यासारखा औषधी पाला,वालाच्या शेंगा, कांदे, बटाटा आणि मांसाहारी करायची झाल्यास मटण,चिकन व्यवस्थित बांधून मडक्याला गवतानं भरून मडक्याच्या तोंडाला मातीनं लिंपून मडक्याला चारी बाजूंनी आगीच्या ज्वालात पोपटी तयार केली जाते.
ती पोपटी आणि भोवताली बसलेले कविता म्हणणार आणि रसिक ती पोपटी खाता-खाता कवितांचा आनंद घेणार हे पोपटी कविसंमेलन २००८ पासून ज्येष्ठ साहित्यिक रायगडभूषण प्रा. एल.बी पाटील यांनी सुरू केलं,त्यांना सुरेश वाजेकर आणि बळीराम भालेकर यांनी पुढची सात वर्षे पोपटी कविसंमेलन ग्रामीण भागात भरविली.त्यानंतर २०१४ पासून ही पोपटी कविसंमेलन पत्रकार गणेश कोळी यांनी प्रा.एल.बी.यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा,पनवेल टाइम्स, पनवेल मीडिया प्रेस क्लब आणि आजची उत्कर्ष सामाजिक,कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या माध्यमातून संपन्न केली जात आहेत. यापोटी कवी संमेलनाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या पोपटी कवी संमेलनाला सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे, तत्कालीन आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर ,संतोष पवार ,भरत सावले सकाळचे तत्कालीन संपादक संजय आवटे ,कोमसापच्या तत्कालीन कार्याध्यक्ष नमिता कीर, रायगडभूषण कोमसापचे जनसंपर्क प्रमुख प्रा. एल.बी.पाटील, सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे, साहेबराव ठाणगे,तत्कालीन तहसीलदार पवन चांडक आदी साहित्यिक- शैक्षणिक- राजकीय- सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.
Post a Comment