आमचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटले नाहीत - सतीश पाटील महानगरपालिका प्रशासनाला दिले बोलके पत्र
आमचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटले नाहीत - सतीश पाटील महानगरपालिका प्रशासनाला दिले बोलके पत्र
पनवेल- महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळ- जवळ पाच वर्षे पूर्ण झालीत, मात्र आजही मूलभूत प्रश्ननांबाबत अद्यापही हवे तितके लक्ष दिले गेले नाही त्यामुळे पनवेलकर मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत, या सुविधा लवकरात लवकर सोडवाव्यात अशा आशयाचे पत्र पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,नगरसेवक सतीश पाटील यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाला दिले.
या पत्रात, महानगरपालिका क्षेत्रातील शहर स्वच्छतेकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे घनकचरा व्यवस्थापन करीत असताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जात नाही ओला आणि सुका कचरा एकत्रितरीत्या वाहतूक केला जातो घंटा गाडी त्या परिसरात जात नाही भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण याविषयी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे महानगरपालिका क्षेत्रातील मान्सून पूर्व सर्व नाल्यांची साफसफाई वेळेत आणि योग्य होणे गरजेचे आहे डास प्रतिबंधात्मक फवारणी सुद्धा नियमित होणे आवश्यक आहे.
मनपा हद्दीतील रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे समाविष्ट गावांचा विकास होण्याच्या दॄष्टिकोनातून महानगरपालिकेने पावले उचलावीत याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे आयुक्त देशमुख यांना पत्र दिले.
यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,नगरसेवक सतीश मोहन पाटील, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, महिला अध्यक्षा नेहा पाटील, कार्याध्यक्षा अनुराधा रंगारी, जिल्हाउपाध्यक्ष दौलत शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष गुलाबराव गायकवाड, जिल्हासरचिटणीस अमित पडवळ, युवक उपाध्यक्ष नितीन त्रिमुखे, कामोठे शहर अध्यक्ष माऊली मोरे, युवा नेते प्रशांत देशमुखे आदी उपस्थित होते.
Post a Comment