नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई ..
नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई ..
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महाराष्ट्रातील शिवसेना -काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आणि सिडको यांच्यावरील भडकाऊ वक्तव्यामुळे ही कारवाई झाली असल्याचे समजते.
ही कारवाई माझ्यावर हेतू पुरस्काराने केली असल्याचे जगदीश गायकवाड यांनी बोलताना सांगितले. सदर तडीपारीचे आदेश मी स्वीकारले आहेत. विमानतळ नामकरण आंदोलनामध्ये मी केलेल्या भाषणामुळे माझ्यावर ही कारवाई केली असल्याचे जगदीश गायकवाड यांनी सांगितले.
Post a Comment