विनोदाची मेजवानी असलेले'सुंदरा मनात भरली ' नाटक पनवेलमध्ये ...
विनोदाची मेजवानी असलेले'सुंदरा मनात भरली ' नाटक पनवेलमध्ये ...
पनवेल - विनोद नाखवा निर्मित विनोदाची मेजवानी असलेले 'सुंदरा मनात भरली ' हे नाटक रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
सुप्रसिद्ध रंगकर्मी संतोष पवार यांनी आतापर्यंत रंगभूमीवर अनेक नाटके दिली आहेत. आता ते एक नवे नाटक घेऊन आले आहेत.
विनोदाची मेजवानी असलेल्या त्यांच्या 'सुंदरा मनात भरली' या नवीन नाटकाने सध्या रंगभूमीवर धमाल उडवली आहे. हास्य आणि विनोदाचा धमाल अनुभव देणाऱ्या या नाटकाने रंगमंचावर धुमाकूळ घातला आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवार याचेच आहे.
त्यामुळे या नाटकाला विनोदाची फोडणी असणारच हे नक्की, नाटकाचा बाज लोकनाट्याचा असला तरी त्यातल्या विविध प्रसंगांमुळे हे नाटक दोन घटका करमणूक करण्याची खात्री देते.
आता नाटकातली 'सुंदरा' कोण हे मात्र प्रेक्षकांना नाटक पाहिल्यावरच कळणार आहे. या नाटकात विकास समुद्र, संतोष पवार, प्रशांत शेटे, रामदास मुंजाळ, ऋषिकेश शिंदे, स्मृती बडदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विनोद नाखवा यांनी या नाटकाची निर्मिती केलेली असून संगीत अशोक पत्की यांनी दिले आहे. याशिवाय नंदेश उमप यांचे गायन, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना व सुनील देवळेकर यांचे नेपथ्य या नाटकाला आहे.
Post a Comment