पनवेलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे एकदिवसीय प्रदर्शन
पनवेलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे एकदिवसीय प्रदर्शन
पनेवल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता किशोर चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या अंतर्गत गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी हे एकदिवसीय प्रदर्शन पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डाॅ.कविता किशोर चौतमेाल यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या प्रदर्शनामुळे टाकाऊ कचऱ्यापासून सुध्दा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश पालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे. तसेच सुक्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे हे या प्रदर्शनातून नागरिकांना समजू शकणार आहे.
Post a Comment