News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अमिषा ठाकूर ठरली मिस नवी मुंबई अकराव्या पर्वाची विजेती ...

अमिषा ठाकूर ठरली मिस नवी मुंबई अकराव्या पर्वाची विजेती ...

       नवी मुंबई: मिस नवी मुंबईच्या अकराव्या पर्वाचा अंतिम सोहळा वाशी येथील फोर पॉईंट हॉटेलमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी सोहळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले.

            वेगवेगळ्या तीन फेऱ्या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई २०२२ चा ताज अमिषा ठाकूर या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे श्रुती राऊल व चहात सिंगहिने बाजी मारली.

            परीक्षक म्हणून फेमिना मिस ग्रँड इंडिया २०१९ ची विजेती व अभिनेत्री शिवानी जाधव,अभिनेत्री आणि निर्माती रोहिनी कपूर, डॉ.अमित कारखानीस (डॉ. त्वचा), संजीव कुमार,अशोक मेहरा यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
"या स्पर्धेचे हे अकरावे पर्व होते गेली अकरा वर्षे या आम्ही स्पर्धेला खंड पडू दिला नाही. या वर्षी चारशे च्या वर मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्यात. 

           या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत ज्या माध्यमातून मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक यापूर्वी चमकलेत आणि भविष्यात सुद्धा आपल्या शहराचे नाव रोशन करतील." अशी माहिती आयोजक यू अँड आय एन्टरटेन्टमेंटचे संचालक आणि या स्पर्धेचे आयोजक हरमीत सिंग यांनी दिली. मनमित सिंग यांच्या संन्यास या बँड ने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे या स्पर्धेची तिसरी फेरी लाईव्ह बँड च्या गायनावर सादरीकरण झाले. या बँडमध्ये गायक मनमित सिंग यांना सोहम दोशी(ड्रमर), रोहन जाधव (लीड गिटारिस्ट),बॉक्सी (बास गिटारिस्ट) आणि गौरव गुप्ता (कीबोर्ड) या कलाकारांची साथ मिळाली. 

इतर उपविजेत्या स्पर्धक 
मिस ग्लोइंग स्किन - अमिषा ठाकूर
मिस उत्कृष्ट नयन - अमिषा ठाकूर
मिस उत्कृष्ट बुद्धिमत्ता - श्रुतिका राठोड
मिस मिस स्वभावसाधर्म्य - अमिषा ठाकूर
मिस इंटरनेट पॉप्युलर - मुस्कान बत्रा
मिस स्टाईल आयकॉन - सानिका दिवेकर
गर्ल ऑफ दि शो - शताक्षी किरण
उत्कृष्ट रॅम्प वॉल्क - चाहत सिंग
बॉडी ब्युटीफुल - श्रुती राऊल
मिस फोटोजेनिक - रक्षा पंजाबी
उत्कृष्ट हास्य - श्रुती राऊल
फ्रेश फेस - खुशी अजवानी
              अंतिम स्पर्धेत ज्या सोळा सौंदर्यवती जिंकण्यासाठी त्यांना रॅम्पवॉकचे प्रशिक्षण स्मृती भतिजा दिले. यापूर्वी तिने मिस इंडिया २०१९ च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असते त्यामुळे मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता स्पर्धकांना आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी प्रशिक्षित केले.तिन्ही वेगवेगळ्या फेरीत रिचा हावरे (राजकुमारी), नीता शर्मा (फॉरेव्हर प्रिटी) आणि आय एन एफ डी वाशी यांनी डिझाईन केलेले ऑउटफिट परिधान करून रॅम्पवॉक केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शेट्टी सेलेब्रिटी होस्ट हिने केले. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment