नव्या मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित होणार : नगरविकास मंत्री यांची महत्वपूर्ण घोषणा
नवी मुंबई- गेल्या ३८ वर्षात सिडको प्रकल्पग्रस्तांना भेडसावणाऱ्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत २५० मीटर पर्यंत नैसर्गिक गरजेपोटी केलेली बांधकामे ही जिथे आहेत त्याच ठिकाणी नियमित (अधिकृत) होणार असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे सांगितले.
यासंदर्भात शासन परिपत्रक (GR) प्रसिद्ध केले आहे. पनवेल - उरण महाविकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा करून नेते शरद पवार ,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या विषयात जातीने लक्ष केंद्रित करून स्थानिक भूमिपुत्रांना मोठा दिलासा दिला.
या निर्णयामुळे येथील भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच खासदार सुनील तटकरे ,खासदार श्रीरंग बारणे व पालकमंत्री आदीतीताई तटकरे या सर्वांचे योगदान मोलाचे ठरले.
....................
' आम्ही पनवेल उरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला त्याचेच फलित म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लोकभावनेचा आदर करून खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला '.
बबन पाटील
अध्यक्ष- पनवेल,उरण महाविकास आघाडी दिवंगत दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती
............
स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर सातत्याने पनवेल,उरण महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे आज राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सकारात्मक पाऊल उचलून हजारो गरजेपोटी घरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनःपूर्वक आभार.
सुदाम पाटील
सचिव- पनवेल,उरण महाविकास
आघाडी दिवंगत दि.बा.पाटील
स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती
Post a Comment