पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूह ... आता आमची शाखा पनवेलमध्येही...
पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूह ...
आता आमची शाखा पनवेलमध्येही...
पनवेल- पुण्याच्या सुप्रसिद्ध चितळे उद्योग समुहाची पनवेलमध्ये शाखा सुरू होत आहे.
चितळे उद्योग समूहाची पनवेल येथील ३४ वी शाखा असून श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने या शाखेचा शुभारंभ शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होत आहे.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समोरील प्रभाकर राजे कॉम्प्लेक्समध्ये भूषण ज्यूस सेंटरच्या बाजूला ही शाखा असून या शाखेच्या उद्घाटन समारंभासाठी पनवेलमधील लोकप्रतिनिधी आणि चितळेे उद्योग समूहातील चितळे परिवार उपस्थित राहणार आहे.
सदरच्या शाखेचे व्यवस्थापन स्वादऋषी इंटरप्राईजेसचे दिलीप कर्वे व पुष्कर कर्वे यांच्याकडे आहे.
Post a Comment