पनवेलच्या टपाल नाका येथील श्री गणेश मित्र मंडळाचा श्री गणेश जयंती उत्सव .....
पनवेलच्या टपाल नाका येथील श्री गणेश मित्र मंडळाचा
श्री गणेश जयंती उत्सव .....
पनवेल - पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत.या दिवशी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
पनवेल शहरातील टपाल नाका येथील श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सवातर्फे श्री गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे.
या जयंती उत्सवानिमित्त पहाटे अभिषेक, गणेशजन्म,आरती आणि भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी आहे.
Post a Comment