पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा संस्थांना मदतीचा हात
पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा संस्थांना मदतीचा हात पनवेल- पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा निधी वितरणाचा कार्यक्रम काश्यप हॉलमध्ये पार पडला .
यावर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला ७१०००- रूपये आणि पनवेलजवळील करूणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला २५००० - रूपये निधी देण्यात आला .
निधीचे धनादेश डॉ. समिधा गांधी व डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमास सुमारे ३५ सभासद हजर होते .
कार्यक्रमाची प्रस्तावना गीतांजली ग्राहक संघाचे संघप्रमुख रमेश एरंडे यांनी केली यामध्ये, २०१८ पासून संस्थांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा योग्य आढावा घेतला .गीतांजली ग्राहक संघ आपत्तीच्या वेळेला धाऊन येतो हेही दोन उदाहरणे सांगून सर्व सभासदांचे आभार मानले .
कार्यक्रमाचा शेवट सुचित्रा गोखले यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला .
Post a Comment