सिलेंडरचा स्फोटाने कामोठे हादरले....
सिलेंडरचा स्फोटाने कामोठे हादरले....
पनवेल (संजय कदम ) पनवेल जवळच्या कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचे स्फोट होवून लागलेल्या आगीत त्या भोजनालयासह बाजूला असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 11 येथे असलेल्या स्वस्तिक प्लाझा या इमारतीमध्ये जयंतीलाल यांचे भवानी भोजनालय आहे. सदर ठिकाणी आज सायंकाळी 7 च्या दरम्यान सिलेंडरचे स्फोट झाले व त्या स्फोटामध्ये बाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे सर्व रहिवाशी घराबाहेर पडल्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
साधारण 4 सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे पथक तसेच पनवेल अग्नीशमन दलाचे बंब व कळंबोली अग्नीशमन दलाचे बंब असे 4 ते 5 बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग पसरली नाही.
Post a Comment