कोमसाप नवीन पनवेल शाखा व सीकेटी विद्यालयाच्यावतीने मराठी भाषा दिनाचे आयोजन ...
पनवेल : मराठी भाषेच्या जडणघडणीत प्रसिध्द साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात विविध साहित्यिक, शैक्षणिक संस्थांच्यावतीने शैक्षणिक, भाषिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन केले जाते.
कोकण मराठी साहित्य परिषद, नवीन पनवेल शाखा तसेेच चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानेे मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.
शनिवार २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती घरत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या उपस्थितीत हा मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.
Panvel
ReplyDelete