पनवेलमध्ये भाजपाची निदर्शने तर महाविकास आघाडीचे आंदोलन - निमित्त नवाब मलिक ....
पनवेल- पनवेलमध्ये निदर्शने आणि आंदोलनाचा आजचा दिवस ठरला. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने निदर्शने केली.
एक आंदोलन तर एक निदर्शने. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर पनवेल शहर भाजपा कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
महाविकासआघाडी विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत सत्तेच्या हव्यासापोटी नवाब मलिक यांना ठाकरे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
केंद्रातील तपास यंत्रणा गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार तसेच मंत्र्यांविरोधात कारवाई करत आहे. या भाजपच्या दडपशाही विरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्यावेळी केला.
Post a Comment