पनवेलमध्ये कोरोना रुग्ण संख्येची हजारी पार ..... सर्वाधिक खारघरमध्ये संख्या
पनवेलमध्ये कोरोना रुग्ण संख्येची हजारी पार .....
सर्वाधिक खारघरमध्ये संख्या
पनवेल- देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, रुग्णसंख्या वाढीने तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसू लागला आहे.
पनवेलमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 7 जानेवारीपासून कोरोना रुग्ण संख्येने हजारी पार केली आहे. 7 जानेवारीला 11 87, 8 जानेवारीला 1375 तर 9 जानेवारीला 1303 अशी रुग्ण संख्या आहे, त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे खारघरमधील आहेत.
कामोठे, पनवेल,नवीन पनवेल या ठिकाणी संख्या वाढलेली तीन दिवसांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देश आणि महाराष्ट्रात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची गरज आहे.
Post a Comment