नवीन पनवेल पोस्ट ऑफिसला कोरोनाची लागण ? २० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह!
नवीन पनवेल पोस्ट ऑफिसला कोरोनाची लागण ?
२० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह!
पनवेल- पनवेल पोस्ट विभागाचे मुख्यालय असलेल्या नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधील जवळ जवळ २० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने पोस्ट ऑफिसच अखेर बंद करावे लागले यामध्ये पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, लेखनिक, पोस्टमन यांचा समावेश आहे.
शनिवारी पोस्ट ऑफिसमध्येच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केल्यानंतर सोमवारी ऑफिस उघडल्यावर तपासणी अहवालामध्ये पॉझिटीव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याविषयी माहिती देण्यात आली व उपचार घेण्यासाठी घरी जाण्यास सांगितले.
पनवेल भागामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच सरकारी कार्यालयात एकाच वेळी कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे कोरोना तपासणी अहवालामध्ये ऑफिसमधील कर्मचारी पॉझिटीव्ह आढळल्याने ऑफिसचे कामकाज वरिष्ठांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. अशा आशयाचे फलक नवीन पनवेल पोस्ट ऑफिसच्या बाहेर लावण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोस्टमास्टर मोरे यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Post a Comment