नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाही - लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याशिवाय प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाही - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल- जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देत नाहीत, तोपर्यंत प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाही असा इशारा लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.
लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामशेठ ठाकूर बोलत होते.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी लोकनेते दि बा पाटील यांच्या जयंती निमित्ताने 13 जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांची भूमिपुत्र परिषदेचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी, भूषण कामगार नेते भूषण पाटील तसेच जे. डी.तांडेल, नंदराज मुंगाजी, उपमहापौर जगदीश गायकवाड, राजेश गायकर, विजय गायकर आदी उपस्थित होते
दि.बा. पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते. गेली आठ ते दहा वर्ष आम्ही नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी करत आहोत,आंदोलनेही केली आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठरावही करण्यात आले आहेत. सिडकोला आज ना उद्या हे द्यावेच लागेल सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सुद्धा प्रश्न सिडकोने सोडवावेत असे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
पनवेलजवळील कोली कोपर गावाच्या दत्त मंदिराजवळ विमानतळ परिसरात ही भूमिपुत्र परिषद होणार आहे. या परिषदेला केंद्रीय मंत्री, आजी- माजी खासदार, आजी- माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत
Post a Comment