आजपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा ....
पनवेल- श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी रोजी होत पनवेलमध्ये होत आहे.
सदरची स्पर्धा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. तीन दिवस चालणारी एकांकिका स्पर्धा ही पनवेलकरांसाठी पर्वणीच असणार आहे.
या स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची उपस्थिती राहणार असून या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने आहेत.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरव करण्यात येणार आहे.तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे मान्यवर व्यक्तींचा या वर्षीपासून जीवन गौरव स्वरूपात 'गौरव रंगभूमीचा' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे असणार आहे.
झालेले संघ
- सेल नसलेला रेडिओ (नूतन मराठा कॉलेज, जळगाव), पहाटेचा मृत्यू (अंभृणी सेवा संस्था, नागपूर), सूर्याची सलामी (व्हीएमव्ही कॉलेज, नागपूर), माझी बाजू माझा पक्ष (डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे शिक्षण संस्था, नागपूर), स. न. वि. वि. (देवल क्लब, कोल्हापूर ), विषाद (रंगपंढरी, पुणे), आय ऍग्री टू (आमचे आम्ही पुणे, पुणे), चिऊताई चिऊताई दार उघड (स्पॉट लाईट पनवेल, पुणे), त्रिशंकू (कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण, रायगड), गुज (फ्रायडे, अलिबाग, रायगड), पार्वती सदन- १०५ अ, ब, क (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, रायगड) हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट थिएटर, मुंबई), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू, मुंबई), साबण (मृदा, कल्याण), राकस (कलासक्त, मुंबई), प्रसाद (रुईया कॉलेज, मुंबई), बेकलाइटी बेकलाइटी (मिथक, मुंबई), जनावर (प्राण, मुंबई), ए वन (माध्यम कलामंच, मुंबई), मौनांतर (नागाबादेवी कलामंच, वसई), व्हेन सुमेध मिट्स राधिका (फोर्थ वॉल, ठाणे) बिलिमारो(ढ मंडळी, कुडाळ), मनस्वीनी (निर्माती, वसई), तिडीक (प्रमुख थिएटर्स, मुंबई), लेखक (कल्लाकार्स थिएटर, ठाणे).
Post a Comment