नवोदित लेखकांसाठी कविता लेखन कार्यशाळा ...
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त
नवोदित लेखकांसाठी कविता लेखन कार्यशाळा
पनवेल - मराठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व कोकण मराठी साहित्य परिषद उरण व रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नवोदित लेखकांसाठी कविता लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरूजी स्मारक येथे रविवार दि. ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन मराठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधीर शेठ तर प्रमुख पाहुणे म्हणून नियामक मंडळाच्या सदस्या शोभाताई सावंत, प्रसाद कुलकर्णी, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, रायगड जिल्हा कोमसापचे पदाधिकारी संजय गुंजाळ, अ.वि.जंगम, गोपाळ शेळके, गणेश कोळी, संजय माने, सुखद राणे, सुधाकर चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत अभिजात मराठी विचार, बोली भाषेतील कविता, कविता स्फुरते कशी?, कार्यशाळेतील कविंच्या रचना आदी चर्चासत्र होणार आहेत.
Post a Comment