विद्यार्थ्यांची कोरोना प्रतिबंधक लस मोहीम.... धन्यवाद! भारत सरकार
विद्यार्थ्यांची कोरोना प्रतिबंधक लस मोहीम
धन्यवाद!भारत सरकार
पनवेल- कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पनवेलच्या के.व्ही. कन्या विद्यालय येथे करण्यात आले.
पनवेलच्या के. व्ही.विद्यालय व व्हि. के.हायस्कूलमध्ये सकाळपासूनच लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी इंजेक्शन घ्यावे लागेल म्हणून दोन विद्यार्थिनी व एक विद्यार्थी घाबरला. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या मनावर भितीचा परिणाम जाणवत होता. थोडेसे अस्वस्थ वाटल्याने उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली आणि एक तासाच्या आरामानंतर त्यांना सोडण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शिक्षण विभागाचे प्रशासकिय अधिकारी बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी रेहाना मुजावर तसेच शाळेचे पदाधिकारी,शिक्षक ,परिचारिका, विद्यार्थी उपस्थित होते.
कधी असे इंजेक्शन घेतले नसेल म्हणून त्या तीन विद्यार्थ्यांना भीतीने त्रास झाला असेल पण त्याव्यतिरिक्त कोणालाही असा त्रास झाला नाही आणि त्याचबरोबर आमचे आजचे लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे डॉ. प्रतीक्षा जाधव यांनी सांगितले. यावेळी लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. आमच्या घरातील सर्वांनीच लसीकरण केले असल्याने आज मलाही लसीकरण करता आले याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या लसीकरण मोहिमेचे धन्यवाद 'भारत सरकार' म्हणून भारत सरकारचे आभार मानले आहेत.
Post a Comment