उद्योजक मंगेश परुळेकर यांच्या पत्नी मानसी परूळेकर यांचे निधन
उद्योजक मंगेश परुळेकर यांच्या
पत्नी मानसी परूळेकर यांचे निधन
पनवेल- मानसी मंगेश परुळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी येथून अंत्ययात्रा काढण्यात आली,अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांच्या त्या पत्नी होत्या.
यावेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, संजय पोतदार, प्रशांत पोतदार, अरविंद सावळेकर, किरण मनोरे, दांडेकर, प्रशांत झुंझारराव, मा.नगरसेवक अनिलकुमार कुळकर्णी, राजू प्रधान, उद्योजक प्रशांत ठाकूर, मा.शहरप्रमुख सुनीत ठक्कर, छोटु हनुमंते, मिलींद पोटे आदींसह अनेक राजकीय पुढारी, मित्र परिवार व व्यावसायिक तसेच परुळेकर कुटुंबिय उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. दरम्यान परुळेकर कुटुंबियांच्यावतीने सर्वांनी विनंती करण्यात आली आहे की, कोरोना विषाणू संक्रमण पुन्हा वाढत असल्याने निर्बंध येवू घातले आहेत. त्यामुळे मंगेश, सौ.मनांकी किंवा चि.मनन यांचे सांत्वन करण्यासाठी व्यक्तीशः भेट घेण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment