News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नैना हटाओ-शेतकरी बचाओ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ....

नैना हटाओ-शेतकरी बचाओ
एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 
प्रकल्प आम्हा शेतकऱ्यांवर जबरदस्तीने 
लागल्यास शेतकरी आत्महत्या करतील...
पनवेल-सिडकोकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होत आहे. 
            पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात मंगळवार 4 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या लाक्षणिक उपोषणाच्या आयोजन करण्यात आले आहे. 
            नैना हटाव- शेतकरी बचाओ या उद्देशाने हे उपोषण होत आहे. नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांच्यातर्फे या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
         यामध्ये सिडकोने 2013 सिडकोने नैना प्रकल्प जाहीर केलेला परंतु या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठेही विकासाची कामे झाली नाहीत. नैना प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 60 टक्के जमीन विनामोबदला घेत आहे. 40 टक्के जमीन शेतकऱ्यांकडे राहणार आहे,त्यासाठी नैना लाखो रुपये प्रतिगुंठा शेतकऱ्यांकडून बेटरमेंट चार्जेस वसूल करणार आहे म्हणून हा प्रकल्प शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे म्हणून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.  
             स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वडिलोपार्जित जागेत बांधलेली शेतघरे, गोठे, चाळी अनधिकृत ठरवून लाखो रुपये वसूल करण्यासाठी नैना प्रकल्पाचे प्रशासन वारंवार शेतकऱ्यांना,व्यवसायिकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून संमती पत्र मागत आहे, याला विरोध आहे.
          गेली आठ वर्ष हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात आहे. पिढ्यानपिढ्या वापरात असणाऱ्या गुरचरण, वनविभागाच्या जागा नाही नैना प्रकल्प घेऊ पाहत आहे,हे शेतकर्‍यांना मान्य नाही हा अन्याय करणारा हा निर्णय आहे अशा विविध मागण्यांसाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
            शेतकऱ्यांना जबरदस्तीने हा प्रकल्प लादला तर शेतकरी आत्महत्या करू शकतील असा इशारा नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलच्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment