नैना प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे पनवेलमध्ये उपोषण
नैना प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे पनवेलमध्ये उपोषण
पनवेल - सिडकोचा नैना प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी पनवेलमध्ये नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. एडवोकेट सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.
यावेळी बोलताना एडवोकेट सुरेश ठाकूर म्हणाले सिडकोच्या नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा प्रकल्प नको म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या आहेत.जो प्रकल्प शेतकऱ्यांना मान्य नाही,तो प्रकल्प करू नये असे असताना सिडको शेतकऱ्यांवर हा प्रकल्प लादत आहे. सिडकोच्या लुटारू अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून नैना प्रकल्पाची मान्यता मिळवली असल्याचे एडवोकेट सुरेश ठाकूर यांनी सांगितले.
या उपोषणाला आमदार बाळाराम पाटील शेकाप पक्षाचे नेते काशिनाथ पाटील पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सल्लागार नामदेव फडके अध्यक्ष वामन शेळके सचिव राज पाटील युवा नेते राजेश केणी डिके भोपी तसेच सरपंच अनिल ढवळे व नरेंद्र भोपी बाळाराम फडके बबन फडके गजानन पाटील रामचंद्र शेळके आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर नेत्यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला
Post a Comment