सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविल्यास १ लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर येतील ...
सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविल्यास
१ लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर येतील ...
पनवेल- सिडकोने प्रकल्पग्रस्तांवर नेहमीच अन्याय केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सिडको गांभीर्याने घेत नाही. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत सिडकोने विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव न दिल्यास तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडवण्यास ४ ते ५ जिल्ह्यातील १ लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर येतील असा इशारा सिडकोला कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला
आहे.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीतर्फे पनवेलजवळील ओवळेफाटा येथे विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात आले. सिडकोने विमानतळ परिसरात कामे बंद ठेवल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. सभेच्या ठिकाणी आणि विमानतळ काम सुरू असलेल्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी आज प्रकल्पग्रस्त आंदोलन करण्याच्या भूमिकेतून आले होते. सिडको तर प्रकल्पग्रस्तांचा टाइमपास करत आहे,चर्चेतून प्रश्न सुटत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करण्याची वेळ येते आहे. वेळप्रसंगी प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाची. आक्रमकता वाढवावी लागणार आहे सिडकोच्या कार्यालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी चालेल. रक्त द्यायची पण तयारी प्रकल्पग्रस्तांनी ठेवायची आहे असे त्यांनी सांगितले.
Post a Comment