आयुक्त गणेश देशमुख यांची धडक कारवाई..... खांदा वसाहतीतील अतिक्रमण
आयुक्त गणेश देशमुख यांची धडक कारवाई..... खांदा वसाहतीतील अतिक्रमण पनवेल - खांदा वसाहतीमधील सेक्टर १७ येते होल्डिंग पॉंडवर भराव टाकून अतिक्रमणाचा होत असल्याची तक्रार मिळतात आयुक्त गणेश देशमुख यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन धडक कारवाई केली.
खांदा वसाहतीमधील सेक्टर १७ मधील धारण तलावात ( होल्डिंग पॉन्ड ) मध्ये भराव टाकून अतिक्रमण होत असल्याची तक्रार मिळताच अतिक्रमणावर पाचच मिनटात कारवाई करण्यात आल्याने आयुक्त देशमुख यांचा हा निर्णय "अभि के अभि " असल्याचा उल्लेख परिसरातील नागरिक करत आहेत.
खांदा वसाहतीमधील सेक्टर १७परिसरात सिडकोमार्फत धारण तलावाची (होल्डिंग पॉन्ड) निर्मिती करण्यात आली आहे. सिडकोने तयार केलेल्या या पॉन्ड परिसरात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये अशा स्वरूपाच्या सूचना सिडकोने फलकाद्वारे केल्या आहेत.
मात्र तरी सुद्धा या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी डेब्रिजचा भराव टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने, या बाबतची तक्रार ऑनलाईन स्वरूपात आयुक्त देशमुख यांना करण्यात आल्यानंतर ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या आयुक्तांनी फक्त पाचच मिनटात अतिक्रमाणावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने आयुक्तांच्या या निर्णयाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
Post a Comment