पनवेलमधील चित्रपट आणि नाट्य कलाकारांना व्यासपीठ रंगरचना कलामंच संस्थेची स्थापना
पनवेलमधील चित्रपट आणि नाट्य कलाकारांना व्यासपीठ
रंगरचना कलामंच संस्थेची स्थापना
पनवेल- पनवेलमधील चित्रपट आणि नाट्य कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी अभिनेते विजय पवार आणि सचिन पाडळकर या दोन मित्रांनी रंगरचना कलामंच संस्थेची स्थापना केली आहे
पनवेलच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात झालेल्या या रंगरचना कलामंच संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रपट लेखक गीतकार संजय पाटील यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन कार्यक्रमास अभिनेता विश्वास नवरे,महाड पोलादपूर रहिवाशी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार,के.वी.कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली वळवी,लेखक निनाद शेटे,अभिनेते नितीन नारकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले,पनवेलची रंगभूमी ही कर्तुत्ववान कलाकारांची आहे. पनवेलच्या रंगभूमीला इतिहास आहे. पनवेलला चित्रपट- नाट्य पुरस्कारांची परंपरा आहे, येथील रंगभूमीने अनेक कलाकारही घडवले आहेत तोच वारसा ही संस्था पुढे चालवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अभिनेता विश्वास नवरे यांनी आपल्या भाषणात, स्थानिक भाषेवर संस्कार झाले पाहिजेत. या संस्थेतून जे कलाकार घडतील त्या यशस्वी कलाकारांना मराठी मालिकेत काम दिले जाईल आश्वासन विश्वास नवरे यांनी दिले.
अभिनेते विजय पवार व सचिन पाडळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात,स्वामींची सेवा म्हणून आज ही संस्था आम्ही उदयास आणली आहे. पनवेलच्या अनेक कलाकारांना हे व्यासपीठ आहे त्यातून रंगभूमीवरील अनेक कलाकार निर्माण होतील असे सांगितले.
Post a Comment