आम्ही चालवू हा पुढे वारसा ... आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ.संजीवनी गुणे यांच्याकडून रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला व मदतीचा हात ....
आम्ही चालवू हा पुढे वारसा ... आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ.संजीवनी गुणे यांच्याकडून रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला व मदतीचा हात ....
पनवेल - पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉ.गोविंद गुणे यांचे ५६ वर्ष रुग्णसेवा करून वयाच्या ९० वर्षी नुकतेच निधन झाले.डॉ. गोविंद गुणे यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना सेवा शुल्क देण्याचा कधी आग्रह केला नाही.
वडिलांच्या या कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक आगळावेगळा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे.या डॉक्टरांनी रुग्ण तपासणी फी देण्याची ऐपत नसणाऱ्या गोरगरीब रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे हे रुग्ण तपासणी फी आकारणार नाहीत तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देतील.सदरहू रुग्णांनी शनिवारच्या तपासणीसाठी पूर्वनोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
या नि:शुल्क तपासणीतून पुढील उपचारांची गरज भासणा-या रुग्णांना (उदा. रुग्णालयातील ॲडमिशन किंवा शस्त्रक्रिया ) डॉ. गिरीश गुणे आणि डॉ.संजीवनी गुणे हे वैयक्तिक फी आकारणार नाहीत इतर सर्व खर्च (उदा. औषधे,शस्त्रक्रिया,साहित्य भूलतज्ञांची फी,रक्त व इतर आवश्यक तपासण्या) रुग्णास करावयाचा आहे.
ही सुविधा देण्यासंबंधी सर्व अधिकार डॉ. गिरीश गुणे आणि डॉ.संजीवनी गुणे यांच्याकडे असतील.
Post a Comment