विमानतळाचे सोमवारी लाक्षणिक काम बंद आंदोलन ... सरकारला एक महिन्याची मुदत
विमानतळाचे सोमवारी लाक्षणिक काम बंद आंदोलन ... सरकारला एक महिन्याची मुदत
पनवेल- सिडकोबरोबर झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत सिडको प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न सोडविण्यास करत असलेली टाळाटाळ त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास अनिश्चित धोरण हे स्पष्टपणे या बैठकीत दिसून आल्याने अखेर
लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्ष कृती समितीतर्फे सोमवार २४ जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
या पत्रकार परिषदेला लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमाल माजी उपमहापौर जगदीश गायकवाड पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत नंदराज मुंगाजी आदी उपस्थित होते
सरकारने प्रकल्पग्रस्तांचे लोकशाही पद्धतीने पुनर्वसन करावे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे याकरिता सरकारला पर्यायाने सिडकोला एक महिन्याची मुदत देणार असल्याचे समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सिडकोने विमानतळाची कामे अगदी जोमाने सुरू केली आहेत परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सिडको टाळाटाळ करीत आहे सिडकोच्या या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी विमानतळात सुरू असलेली कामे बंद करण्यात येणार आहेत तरी सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र स्थानिक भूमिपुत्र यांनी आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment