केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक भूषण पोवळे यांची भाजपच्या कामगार आघाडी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक भूषण पोवळे यांची भाजपच्या कामगार आघाडी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक पनवेलमधील भूषण पोवळे यांची भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण पोकळे यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भूषण पोवळे यांची नियुक्ती कोकण विभाग भाजपच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष कमलेश राणे यांनी केली आहे.
पनवेलमधील एक तरुण नेतृत्व व राणे कुटुंबीयांवर असलेली निष्ठा यामुळे भूषण पोवळे यांच्यावर कामगार आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रामध्ये, आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात विशेषतः कोकण विभागात भाजपा कामगार आघाडीचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगार तसेच मजुरांची विविध प्रलंबित मागण्याबाबत आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावे. कामगार वर्गातील जास्तीत जास्त बांधव भाजपाकडे जोडण्याचे अथक प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.
भूषण पोवळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.
Post a Comment