नैना-सिडको विरोधात शेतकऱ्यांचा पनवेलमध्ये भव्य मेळावा ...लढवय्ये नेते आ.जयंत पाटील, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, आ.हितेंद्र ठाकूर यांची उपस्थिती
नैना-सिडको विरोधात शेतकऱ्यांचा पनवेलमध्ये भव्य मेळावा लढवय्ये नेते आ.जयंत पाटील, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी, आ.हितेंद्र ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल - सिडकोच्या नैना प्रकल्पाला प्रखर विरोध करण्यासाठी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलतर्फे शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे
या मेळाव्यास महाराष्ट्रातील लढवय्ये नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पनवेल तालुक्यातील स्वप्ननगरी येथे हा मेळावा होत आहे. या भव्य मेळाव्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलतर्फे करण्यात आले आहे.
सिडकोचा नैना प्रकल्प अन्यायकारक असून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी सांगितले.
पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश केणी यांनी या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणा-या नेत्यांची माहिती दिली. रक्त सांडले तरी चालेल पण आम्ही नैना प्रकल्प होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.
नैना प्रकल्पाचे अधिकारी शेतकऱ्यांची दखल घेत नाही म्हणून आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन, मेळावे घ्यावे लागत आहेतअसे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सल्लागार नामदेव फडके यांनी सांगितले.
राजकीय चपला बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी एकजुटीने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन या संघर्ष समितीचे सुभाष गोपी यांनी केले आहे.
Post a Comment