सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा... सुप्रसिद्ध गायक,मराठी बिग बॉस फेम दादुस, विरोधी पक्षनेते डॉ.प्रीतम म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती
सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा...
सुप्रसिद्ध गायक,मराठी बिग बॉस फेम दादुस, विरोधी पक्षनेते डॉ.प्रीतम म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती*
(*पनवेल टाइम्स वृत्तसेवा) ....
पनवेल- पनवेलच्या सरगम संगीत अकॅडमीचा ४था वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यास पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉ. प्रीतम म्हात्रे, झी टीव्हीच्या कार्यकारी निर्मात्या सुवर्णा राणे, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, संगीत अलंकार गुरुवर्य हरिदासजी महाले,सुप्रसिद्ध गायक बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस, कफ संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवान बिरमुळे,माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन नरेश पाटील व विद्यार्थी वृंद यांनी केले आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment