नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्युक्षणच्या गोदामाचे उदघाटन
नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्युक्षणच्या गोदामाचे उदघाटन
पनवेल - पनवेल महानगरपालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते उद्योजक संजय थोरबोले यांच्या प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्युक्षणच्या दहिसर ( पिंपरी ) येथील नव्या गोदामाचे उदघाटन मकर संक्रातीच्या दिवशी झाले..
यावेळी नगरसेवक रवीन्द्र भगत यांनी, कुरियर बॉय ते उद्योजक बनण्याच्या थोरबोले यांच्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक केले. आज मेहनती शिवाय पर्याय नाही. कुठल्याही कामामध्ये कष्ट, मेहनत केली तर अनेक उंच शिखरे गाठता येतात. त्याचे उदाहरण आज आपल्यासमोर आहे असे नगरसेवक रवींद्र भगत यांनी सांगितले.
Post a Comment