News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रकल्पग्रस्तांचे लढे..राजकीय प्रवास... शैक्षणिक कार्य अशा प्रवासातील प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांच्या कार्यकर्तुत्वावर एक नजर.....

प्रकल्पग्रस्तांचे लढे..राजकीय प्रवास... शैक्षणिक कार्य अशा प्रवासातील प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांच्या कार्यकर्तुत्वावर एक नजर.....

प्रकल्पग्रस्तांचे लढे..राजकीय प्रवास... शैक्षणिक कार्य अशा प्रवासातील प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांच्या कार्यकर्तुत्वावर एक नजर.....

 👉 निस्वार्थी निष्कलंक नेता – १९५२ ते १९९८ अशी ४६ वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द, त्यात जिल्हा बोर्ड सदस्य, नगराध्यक्ष, ते पाच वेळा विधानसभेचे आमदार, दोन वेळा खासदार, एकदा विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते *अशी यशस्वी कारकिर्दीत स्वतःच्या आदर्श आणि नितीमुल्यांवर ठाम राहत आपली राजकीय कारकीर्द फक्त सामाजकारणासाठी वाहणारा, ज्याचे घर हि कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी काढून बांधले असा निष्कलंक नेता.

👉 मुंबई महाराष्ट्राला मिळावी,बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून रक्ताचे पाणी करणारा नेता, बेळगाव मध्ये ११ महिने कारावास भोगणारा नेता, मुंबईत मराठी टक्का टिकावा तो वाढावा म्हणून ५० आणि ६०च्या दशकात खऱ्या अर्थाने काम करणारा नेता.

👉 क्रांतिसिंह नारायण नागू पाटील आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कर्तुत्वाने निर्माण झालेल्या कुळकायद्याला विधीमंडळाच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबवायला भाग पडणारा नेता.

👉 महाराष्ट्राचा महसूल कायदा, कुळकायदा, सैनिकांच्या नावावरील जमिनी कुळ म्हणून ठेवण्याचा कायदा, सात-बाऱ्याच्या उताऱ्यात तलाठ्याचे अधिकार काढून घेणारा कायदा, वरच्या शेतातील पाणी खालच्या शेतात सोडण्याचा कायदा, सिडको आणि एमआयडीसी संदर्भातील भूसंपादनाचा कायदा, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा अशा महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी हिताच्या परोगामी कायद्यांमध्ये शेतकरी हिताच्या तरतुदी करायला भाग पाडणारा नेता.

👉 स्त्रीभ्रूण हत्या खऱ्या अर्थाने रोखणारे,संपूर्ण भारत देशासाठी जो कायदा १९९४ साली पास झाला, तो  सर्वप्रथम महाराष्ट्रात गर्भजल परीक्षण आणि निदान प्रतिबंधित कायदा १९८७ मध्ये पास करायला भाग पाडणारे आणि असंख्य मुलींसाठी “बा” ठरलेले, आपले “दिबा....

👉 ओबीसी आरक्षणा संदर्भात १९८३ साली राज्यसरकार मुद्द्याला गांभीर्याने घेत नाहीत म्हणून आपल्या आमदारकी आणि विरोधीपक्षनेते पदावर पाणी सोडणारे, राज्यसरकारच्या विरोधात जाऊन खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते कोकण असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ओबीसी आरक्षणासाठी जनसमर्थन निर्माण करणारे आणि देशात अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणा विरुद्ध दंगली उसळल्या पण महारष्ट्रात शांतता राखत ओबीसी आरक्षण यशस्वी करणारे नेते म्हणजे आपले “दिबा”...
 
👉 सिडकोच्या विरुद्ध १९८४ साली झालेला रक्तरंजित लढा ज्यात पाच जण हुतात्मे झाले, आणि दिबा स्वतः जखमी होऊन *जमिनीच्या बदल्यात जमीन मिळवून देणाऱ्या १२.५% विकसित भूखंड परताव्याची योजना आणायला सरकारला भाग पाडणारे नेते.
👉 २०१३चा केंद्र शासनाचा नवीन भूसंपादन आणि पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायद्यात ज्या शेतकरी हिताच्या तरतुदी आहेत त्या पुर्नवसन आणि पुनर्स्थापना तरतुदींचे जनक म्हणजे दिबा.

👉 आणीबाणीच्या काळात तुरुंगात स्वतःला प्रथम दर्जा मिळून हि त्यांच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाच्या सुविधा दिल्या म्हणून तुरुंगातच सत्याग्रह आंदोलन करत, आणीबाणीत हि तुरुंग प्रशानासाला नमवत सामान्य कार्यकर्त्यांना हि प्रथम दर्जाच्या सुविधा देणारे नेते.

👉 छत्रपती शिवाजी महाराजांसह*  महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबसाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे दिबांचे आदर्श होते आणि जे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्याच मुळे शिक्षणाचा हा वारसा पुढे चालावा म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उरण पनवेल सह रायगड आणि ठाणे जिल्ह्यात शाळा आणि कॉलेजेस उभारून *शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवणारे नेते म्हणजे आपले दिबा......

 🙏 दिबांचे चरित्र आणि कार्यकर्तुत्व फार मोठे आहे, त्यातील फक्त काही ठराविक घडामोडींचा वर उल्लेख आहे, त्यामुळे दिबा कोणा एका भागाचे वा जाती समूहाचे नेते नसून संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील कष्टकर्यांचे, शेतकऱ्यांचे आणि जनसामान्यांचे ते नेते होते आणि त्याच मुळे त्यांच्याच जन्मभूमीत होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लागलेच पाहिजे ह्या साठी आपण सर्व आग्रही आहोत.🙏



Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

1 comments:

  1. लोकनेते श्री दिबा. पाटील साहेबांच्या संघर्षमय जिवनाची संकल्पित केलेली छान आणि सुंदर महिती.

    ReplyDelete