नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव द्यावे - रामदास आठवले
नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव द्यावे - रामदास आठवले
पनवेल- प्रकल्पग्रस्तांसाठी दि.बा. पाटील यांनी संघर्ष केला आहे, या संघर्षातून येथील भूमिपुत्रांना न्याय मिळाला आहे. दि.बा. पाटील हे काही काळ शिवसेनेसोबत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि.बा .पाटील हे वडिलांसारखे होते म्हणून उद्धव ठाकरे सरकारने मनाचा मोठेपणा दाखवत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पनवेलचया कोळी कोपर येथील विमानतळाच्या जागेत झालेल्या भूमिपुत्रांच्या निर्धार परिषदेत केली.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने भूमिपुत्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
दि.बाा .पाटील संघर्षशील नेतृत्व होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उडवायचे असेल तर या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे असे सांगून विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे असा जाहीर पाठिंबा आरपीआयच्यावतीने रामदास आठवले यांनी संघर्ष कृती समितीला दिला.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते तर यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, 27 गावचे प्रेम पाटील, दशरथ भगत, दि.बा.पाटील यांच्या लढ्यातील एक साक्षीदार भारती पवार ,जयेश ठाकरे, गुलाबराव वझे ,संतोष केणे, कामगार नेते भूषण पाटील, रुपेश धुमाळ, आमदार महेश बालदी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, जर प्रकल्पग्रस्तांमध्ये दृढनिश्चय असला तर न्याय मिळाला वेळ लागणार नाही. दि.बा. पाटील यांची शंभरावी जयंती साजरी करण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव लागले पाहिजे, याचप्रमाणे सिडको संबंधित ज्या ज्या गावांमध्ये अजून पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न येत्या 24 तारखेपर्यंत जर सिडकोने सोडवले नाही तर विमानतळाचे काम चालू द्यायचे नाही असा इशाराही रामशेठ ठाकूर यांनी सिडकोला दिला.
नवी मुंबईचे दशरथ भगत यांनी आपल्या भाषणातून प्रकल्पग्रस्तांची मने जिंकली. ही जन्मभूमी, ही कर्मभूमी,संघर्षभूमी आणि ज्याने रक्त सांडविले ते फक्त दि.बा.पाटील. यांचेच नाव या विमानतळाला लागले पाहिजे असे सांगितले
Post a Comment