जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांनी ऑफिसमधून बाहेर पडा पनवेलच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना ...
जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांनी ऑफिसमधून बाहेर पडा
पनवेलच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या सूचना
नैना प्रकल्प रद्द करावा एकमुखी मागणी ....
पनवेल -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये पनवेलकरांच्या प्रश्नांवर आढावा बैठक झाली.या बैठकीत पनवेलच्या विविध विकास कामांबाबत प्रश्न-उत्तरे झाली. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नैना प्रकल्प रद्द करावा अशी एकमुखी मागणी झाली.
या बैठकीला पालकमंत्री आदिती तटकरे,खासदार सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील,काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत तसेच आर.सी. घरत, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, सुदाम पाटील,सुनील मोहोड, शिवसेनेचे शिरीष घरत यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांची आणि प्रकल्पांची माहिती दिली.
कोरोना लसीकरण, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, प्रभाग निहाय कार्यालय, कचऱ्याची विल्हेवाट, अवजड वाहनांची पार्किंग व्यवस्था, सिडकोकडून हस्तांतरित होणारे भूखंड, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, पाणीपुरवठा, भविष्यात विकासाच्या दृष्टिकोनातून पनवेलमध्ये राबवणारे प्रकल्प, गाढेश्वर धरणाची उंची वाढवणे आदींविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले, त्यांनी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बसून जनतेची कामे होत नाहीत, त्यासाठी आपल्या कामकाजाच्या भागा-भागांमध्ये फिरा,अशा सूचना केल्या. एखादा तास जरी तुम्ही ऑफिसच्या बाहेर पडलात तर कामकाजामध्ये बराच फरक पडेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांना जनतेचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यास सांगितले.
Post a Comment