कर्नाळा सर्कल (बेट) इतिहास जमा होणार ...!
कर्नाळा सर्कल (बेट) इतिहास जमा होणार!
पनवेल - पनवेल शहरात गर्दी असलेल्या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने कर्नाळा सर्कल (वाहतूक बेट) तोडण्यास सुरुवात केली आहे.
पनवेलच्या जुन्या भाजी मार्केटजवळ कर्नाळा बँकेने कर्नाळा सर्कल बांधले होते.वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुन्या भाजी मार्केट जवळील कर्नाळा सर्कलचा आकार कमी करावा अशा सूचना केल्या होत्या, ही सूचना वारंवार येत असल्याने अखेर पनवेल महानगरपालिकेने सुरळीत वाहतुकीसाठी कर्नाळा सर्कल पाडण्यास सुरुवात केली आहे. हे सर्कल पूर्णपणे पाडले जाणार असून या जागी असलेली जुनी पारंपारिक दोन मंदिरे जशीच्या तशी ठेवण्यात येणार आहेत.
कर्नाळा सर्कल पूर्णपणे तोडल्यानंतर जी जागा रिकामी होणार आहेत तेथून वाहनांसाठी रुंद रस्ता होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, त्यामुळे कर्नाळा सर्कल इतिहास जमा होईल.
Post a Comment