अलिबाग कोमसापचा वर्धापन दिन साजरा
कोमसाप मेहनतीने सक्षम उभी आहे -
प्रा .एल.बी .पाटील
अलिबाग कोमसापचा वर्धापन दिन साजरा
अलिबाग- कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोप मोठ्या निष्ठेने लावले.त्यांच्या आणि सोबतीच्या अविरत मेहनतीने ते रूप मोठ्या व्रुक्षाच्या रूपात कोमसाप सक्षम झाली आहे. असा विचार अलिबाग शाखेच्या वर्धापन दिनी अध्यक्षस्थानावरून भाषण करतांना रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील यांनी खंडाळा येथे मांडला.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, शाखाध्यक्ष पूजा वैशंपायन, डॉ. श्रीसौवझे यांनीही विचार मांडले.
शाखेतील कवी लेखकांच्या रचना सादर करण्याचा कार्यक्रम रवींद्र थळे यांच्या सूत्रसंचालनाखाली अतिशय सुरेख संपन्न झाला. त्या कार्यक्रमात सुजाता पाटील, वैशाली भिडे, नागेश कुलकर्णी, शरद कोरडे,रमेश धनावडे, वर्षा दिवेकर,निर्मला फुलगावकर अमेया आपटे, संध्या कुलकर्णी, डॉ बाबर ,श्रीसौ. श्रुती बोंद्रे ,तळकरसर,श्रद्धा वैशंपायन
यावेळी शिक्षकरत्न अनंत देवधरकर आणि गुणसंपन्न शिक्षिका उत्तरा खाडीलकर यांचा कोमसाप तर्फे सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक निर्मला फुलगावकर ,आभार सुजाता पाटील यांनी मानले.त्यानंतर संगीत रजनीचा सुरेल कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला.
Post a Comment