News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सदस्य नोंदणी अभियान ,आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेसची बैठक

सदस्य नोंदणी अभियान ,आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेसची बैठक

सदस्य नोंदणी अभियान, आगामी 
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर .....
रायगड जिल्हा कॉंग्रेसची दिवेआगर येथे आढावा बैठक
        पनवेल- रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली  दिवेआगर येथील आर्या इन रिसोर्ट येथे पार पडली. 
     बैठकीत जनजागरण अभियान, सदस्य नोंदणी अभियान, युथ कमिट्या व होऊ घातलेल्या ६ नगरपंचायती निवडणुकी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बरगे, तळा व म्हसळा नगरपंचायत प्रदेश निरीक्षक डॉ. मनोज उपाध्याय व खालापूर नगरपंचायत प्रदेश निरीक्षक  सुधीर पवार यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून महत्वाच्या सूचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष महेंद्र्शेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी, निरीक्षक व जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत तालुका निहाय नगरपंचायत निवडणूक व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.
       सदर बैठकीस रायगड जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा  अॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष  मिलिंद पाडगावकर उपाध्यक्ष  ज्ञानदेव पवार, उपाध्यक्ष  अनंतराव गोंधळी, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, उरण विधानसभा प्रभारी मा. अकलाक सिलोत्री, महाराष्ट्र फिशरमन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मार्तंड नाखवा, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती. वासंती उमरोटकर, राजाभाऊ ठाकूर, रामशेठ घरत, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष  श्री. विजय तोडनकर, म्हसळा ता. अध्यक्ष डॉ. मुईजशेख, माणगाव ता. अध्यक्ष विकास सुर्वे, मुरुड ता. अध्यक्ष  श्री.सुभाष महाडिक, कार्याध्यक्ष  श्री. असगर दळवी, तळा ता. अध्यक्ष  श्री. खेळूवाजे, पोलादपूर ता. अध्यक्ष  श्री. अजय सलगरे, खालापूर ता. अध्यक्ष मा. श्री. नाना म्हात्रे, पेण ता. अध्यक्ष अशोक मोकळ, पनवेल ता. अध्यक्ष  महादेव कटेकर, खोपोली शहर अध्यक्ष  रिचर्ड जॉन, अलिबाग ता. अध्यक्ष मा. योगेश मगर,  श्रीमती रेखा जाधव,  श्री. महेंद्र जाधव,  मोनिकाताई पाटील, श्रीवर्धन महिला अध्यक्षा सौ. हेमांगी चोगले, श्रीवर्धन शहर अध्यक्ष सौ. सुप्रिया करंदीकर, श्री. शहनवाज अकलेकर,  सुनिलभाई थळे, म्हसळा तालुका कॉंग्रेस पर्यावरण सेलचे अध्यक्ष बाबाजान पठाण, अल्पसंख्यांक अध्यक्ष नवनाथ ठोकल, शहर अध्यक्ष  बाबाभाई हुझिक, शहर युवक अध्यक्ष सुफीयान हळदे, विधानसभा युवक अध्यक्ष  मन्सूर धनसे, रफी घरटकर, सलीम धनसे, तेजस वेटकोली व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       श्रीवर्धन ता. अध्यक्ष विजय तोडणकर यांनी कार्यक्रमाचे  बैठकीचे  नियोजन केले होते. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले व सर्वांच्या सहकार्याने आगामी निवडणुकीत कॉंग्रेस निश्चित चांगली कामगिरी करेल अशी खात्री दिली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment