.......आता लक्ष पनवेल ते बोरवली रेल्वे सेवेकडे
आता लक्ष पनवेल ते बोरवली रेल्वे सेवेकडे .....
पनवेल : पनवेल ते गोरेगाव लोकल सेवेचा शुभारंभ पनवेल स्थानकातून करण्यात आला.
या रेल्वेसेवेचा शुभारंभ भारतीय रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य अभिजित पां. पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
पनवेल येथून हार्बर मार्गाने मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणारी हार्बर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईच्या विकासाला गती मिळाली. कालांतराने येथील लोकवस्ती वाढली आणि प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रवाशांना अनेक अडचणी येवू लागल्या आणि याची दखल पनवेल प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांनी घेवून पाठपुरावा करून ही रेल्वे सेवा अंधेरी पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत आणली. पुढे ही रेल्वेसेवा गोरेगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळाले.
यावेळी भारतीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट, राष्ट्रवादीचे नेते सुदाम पाटील, पनवेल रेल्वे प्रबंधक श्री.मीना आदींनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना डॉ. भक्तीकुमार दवे यांनी, पनवेल ते गोरेगावपर्यंत सुरु झालेली रेल्वे सेवा लवकरच ती बोरीवलीपर्यंत सुरू करण्यासाठी प्रवासी संघातर्फे प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
Post a Comment