कळंबोलीत एकाच इमारतीमध्ये पाच कोरोना रुग्ण पनवेलकरांच्या चिंतेत भर?
ओ..........मिक्राॅन
कळंबोलीमध्ये एकाच इमारतीमध्ये
५ कोरोना रुग्ण
पनवेलकरांच्या चिंतेत भर?
पनवेल - कळंबोली वसाहतीमध्ये एकाच इमारतीमध्ये पाच कोरोना रुग्ण सापडल्याने पनवेलकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
कळंबोलीच्या सेक्टर 10 मधील 'सावन गार्डेनिया' या इमारतीमध्ये पाच रुग्ण सापडले. त्यामुळे महानगरपालिकेचे हि इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना व ओमिक्राॅन रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शासनाने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्यासाठी रात्रीचे जमावबंदीचे आदेश दिले आहेत. पनवेलमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्येही जमावबंदीचे आदेश दिले आहेत. महानगरपालिका व आरोग्य विभाग कामाला लागले आहे.
महापालिका
प्रशासनाची बैठक ....
राज्यात सर्वत्र ओमायक्रॉन रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत असल्याने महानगरपालिका क्षेत्रात खबरदारीच्या दृष्टीने उपाय योजना करण्याबाबतीत आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी बैठक घेतली. उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, चारी प्रभाग अधिकारी यांच्यासह इतर पालिका अधिकारी यांची बैठक घेतली.
कोरोनाचे रूग्ण ज्या सोसोयटीत आढळतील त्या इमारतीमधील सर्व नागरिकांच्या चाचण्या करणे, तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करणे तसेच लसीकरणावर भर देण्यासाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने वैद्यकिय विभागाच्या टिम बरोबर प्रभागअधिकाऱ्यांनी सहकार्य करणाच्या सूचना आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या.
याचबरोबर नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्समध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक राहील. बाजारपेठा, शहरातील मुख्य रस्ते, वाईन शॉप, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे तसेच रात्री जमावबंदी आदेशाची अमंलबजावणी कडक करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत.
Post a Comment