एकच मिशन फक्त निवडणुका! ..... पनवेल - उरण महाविकास आघाडीचा पनवेलमध्ये जाहीर मेळावा
... एकच मिशन फक्त निवडणुका!
पनवेल- उरण महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा
पनवेल - येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल -उरण महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा होत आहे.19 डिसेंबर रोजी पनवेलच्या काळण समाज हॉल येथे हा मेळावा होत आहे. या मेळाव्याला पनवेल-उरण महाविकास आघाडीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची ताकद, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समन्वय- संवाद, जागावाटप, भाजपला टक्कर देण्यासाठी विविध व्यूवहरचना आदींवर या मेळाव्यात चर्चा होईल असे समजते.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही पनवेल व उरणमध्ये सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू असे सांगितले आहे.
या मेळाव्यासाठी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर.सी. घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक उपस्थित राहणार आहेत.
पनवेल- उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील,सचिव सुदाम पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
Post a Comment