कमी दरात वडा- मिसळ पाणी आणि चहाही .....
कमी दरात
वडा - मिसळ
पाणी आणि चहाही
मराठी खाद्यसंस्कृती जपण्याचा 'रायगड वडापाव'चा प्रयत्न
पनवेल-मराठी माणसाचे आवडीचे पदार्थ असलेले वडा, मिसळ हे पनवेलमध्ये कमी पैशात मिळत असल्याने पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पनवेलातील गुजराती शाळेजवळील सखू कृपा बिल्डिंगच्या गाळ्यामध्ये ‘रायगड वडापाव’ हे खाद्य पदार्थाचे दुकान अभिषेक पवार व त्याच्या सहकारी याने सुरू केले आहे. महाराष्ट्रीयन विशेषतः मराठी माणसाचा आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव आणि मिसळपाव हे ग्राहकांना स्वस्त दरात रायगड वडापाव दुकानातून दिले जात आहेत. वडापाव आठ रूपये तर मिसळपाव पंचवीस रूपयांना दिले जात आहे. या कमी दरामुळे ग्राहकांची दुकानात गर्दी आहे. दर कमी असल्याने ग्राहकांना हे परवडत आहे. पैशांचीही बचत होते आणि चांगल्या चवीने समाधानही वाटत आहे.
याबरोबर मालक अभिषेक पवार यांनी पाण्याची बॉटल, चहा यांचेही दर कमी ठेवले आहेत.
महाराष्ट्राची खाद्य पदार्थांची परंपरा टिकावी म्हणून बाजारातील दरापेक्षा आम्ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात आम्ही वडापाव, मिसळपाव विकत आहोत. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे आम्ही समाधानी आहोत.
या रायगड वडापाव दुकानाचा ग्राहकांच्या प्रतिसादामुळे पनवेल तसेच कामोठे या ठिकाणी विस्तार करणार असल्याचे अभिषेक पवार यांनी सांगितले.
Post a Comment