News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शासनाने जमीन संपादनाचे शिक्के काढा : पनवेलच्या पडघे परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्या .....

शासनाने जमीन संपादनाचे शिक्के काढा : पनवेलच्या पडघे परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्या .....

शासनाने जमीन संपादनाचे शिक्के काढा :
पनवेलच्या पडघे परिसरातील 
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा ....
शिवसेना नेते बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
            पनवेल -  पनवेल जवळील पडघे आणि परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबार्यावर सिडकोच्या महसूल विभागाने १९७० सालापासून  भुसंपादनाचे  शिक्के मारले आहेत. या जमिनींवर सदर शिक्क्यांमुळे कसल्याही प्रकारची विकासकामे शेतकऱ्यांना करता येत नाहीत. हे भुसंपादनाचे शिक्के उठवावेत म्हणून शिवसेनेचे नेते बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
           यावेळी नगरसेवक विष्णू जोशी तसेच ग्रामस्थ पांडुरंगशेठ भोईर, नाथा बुवा पाटील,जनार्दनशेठ भोईर, वसंतशेठ भोईर,यशवंत भोईर, बबन भोईर, हिरामण भोईर, भरत कांबळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करावा म्हणून दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते बबन पाटील  यानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे .

त्याच विषयाच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांचा हा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. सदर विनंतीवर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सिडको व्यवस्थापकांशी तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा करून स्थानिकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना केल्या असल्याचे समजते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment