शनिवारी मनोरंजन अनलॉक@ पनवेल
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 'मनोरंजन अनलॉक @पनवेल' या संगीत नृत्य आणि नाटकांची मेजवानी असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी ही भाजपच्या वतीने एक मनोरंजक पर्वणी असणार आहे. महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करून हा कार्यक्रम होणार आहे. या मनोरंजनात कलादर्पण सांस्कृतिक विभाग ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) नवीन पनवेल यांच्या माध्यमातून "बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून" ही धमाल विनोदी एकांकिका सादर होणार असून सर्व पनवेलचे कलाकार संगीत नृत्य मराठी आणि हिंदी गाण्यांची सुरेल मैफल रसिकांना भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निःशुल्क प्रवेशिकांसाठी अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा.
Post a Comment