पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये ख्रिसमस ट्रीची सजावट
पनवेल :पनवेलकरांसाठी अभिमान असलेला पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये ख्रिसमस निमित्त भव्य ख्रिसमस ट्रीची सजावट करण्यात आली आहे.
ख्रिसमस ट्रीला केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे येणाऱ्या ग्राहकांचे हा ट्री लक्ष वेधून घेत आहे. उंच ख्रिसमस ट्री बनवण्यात आल्याने ग्राहकांसाठी ख्रिसमस सणाचं एक आकर्षण ठरला आहे.
यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी ख्रिसमस अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे , असलं तरी ख्रिसमस सणाची धामधूम काही कमी नाही. ओरियन मॉलमधील ख्रिसमस ट्री हा आकर्षक सजावटीमुळे ग्राहकांचा आनंद वाढवत आहे.
Post a Comment